होम/आमच्याबद्दल

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाबद्दल

महाराष्ट्रातील पर्यटनाचा विस्तार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यभरात पसरलेली आमची दर्जेदार पर्यटक निवासस्थाने आणि उपहारगृहे पर्यटकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहेत. ऐतिहासिक सहलींपासून ते साहसी खेळांपर्यंत आणि खास टूर पॅकेजेसपासून ते जलक्रीडांपर्यंत... महाराष्ट्राचे अथांग वैभव मनसोक्त अनुभवण्यासाठी आम्ही तुम्हाला देतोय उत्तम सोयी आणि संधी!

महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा अनुभवतानाच एमटीडीसी निवासस्थाने प्रेक्षणीय स्थळांच्या मनमोहक दृश्यांसह आरामदायी मुक्कामासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच, आमच्या उपहारगृहात तुम्हाला स्थानिक चवीचे खास पदार्थ चाखायला मिळतील. शांत समुद्रकिनारे, अथांग डोंगररांगा, पावन तीर्थक्षेत्रे आणि रोमांचक जंगले... महाराष्ट्राच्या या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी एमटीडीसी आपले सहर्ष स्वागत करीत आहे!

33
एमटीडीसी पर्यटक निवासस्थाने
45
टूर्स आणि पॅकेजेस
3
जलक्रीडा
25
अनुभव
1950
निवास आणि न्याहारी
61
महाभ्रमण
0
मंगल सोहळा: एमटीडीसी सोबत
0
व्यावसायिक बैठका व परिषदा

आमचे कार्य

आम्ही केवळ निवासस्थानेच नाही, तर मोक्याच्या ठिकाणी असलेली आमची उत्तम उपाहारगृहे देखील पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देतो. पर्यटन स्थळांच्या अगदी जवळ असलेल्या आमच्या उपहारगृहात तुम्ही अस्सल स्थानिक भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. महाराष्ट्रातील सर्वोत्तम पर्यटन स्थळांच्या ठिकाणी निवास आणि विविध अनुभवांची सोय करून, आम्ही सर्व प्रकारच्या पर्यटकांच्या गरजा पूर्ण करतो.

Sustainable Living

शाश्वत जीवनशैली

आमच्या निवासस्थानांमधून मिळणारा नफा आम्ही पुन्हा त्याच वास्तूंच्या सुधारणेसाठी वापरतो. आमचा उद्देश ही ठिकाणे अधिक पर्यटक-स्नेही आणि पर्यावरणपूरक बनवणे हा आहे, जेणेकरून आपल्या सभोवतालचा निसर्ग आणि नैसर्गिक अधिवास सुरक्षित राहील.

Local Empowerment

स्थानिक सक्षमीकरण

एक शासकीय संस्था म्हणून, आम्ही रोजगाराच्या संधी निर्माण करून स्थानिक समुदायांना सक्षम करतो. स्थानिकांना आत्मनिर्भर बनवणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Hospitality First

अतिथी देवो भव

पर्यटन क्षेत्रात आम्ही आमच्या उत्तम सेवेसाठी ओळखले जातो. पर्यटकांना सुखद आणि आनंददायी अनुभव मिळावा, यातच आम्हाला खरा अभिमान वाटतो. आमच्या बहुतांश निवासस्थानांमध्ये उत्तम उपाहारगृहे आहेत, जिथे तुम्हाला स्थानिक चवीच्या दर्जेदार पदार्थांचा आस्वाद घेता येईल.

Highlighting Our Heritage

आपला वारसा, आपली ओळख

आम्ही स्थानिक संस्कृती, खाद्यपरंपरा, संगीत आणि लोकनृत्यांचे दर्शन घडवून आपल्या वारसाचा अभिमान जपतो. महाराष्ट्राचा इतिहास आणि परंपरांची ओळख पर्यटकांना करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.

आमचे ध्येय

महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. पारदर्शक व्यवहार, योग्य किंमत आणि पर्यटकांचे समाधान हीच आमची ओळख आहे.

आमचा संकल्प

आधुनिक सोयी-सुविधा आणि सुसज्ज पायाभूत सुविधांच्या जोरावर, महामंडळाला पर्यटन क्षेत्रातील सर्वांत पसंतीची संस्था बनवणे हे आमचे ध्येय आहे. निसर्गाची जपणूक आणि स्थानिकांना बळ देत, पर्यटन क्षेत्रातील एक आघाडीची सरकारी संस्था म्हणून नाव कमावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आमची ओळख

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मर्यादित (एमटीडीसी) ची स्थापना २० जानेवारी १९७५ रोजी कंपनी कायदा १९५६ च्या तरतुदींनुसार राज्य सरकारची कंपनी म्हणून करण्यात आली. महामंडळाचे नोंदणीकृत कार्यालय चर्चगेट, मुंबई येथे स्थित आहे.

महाराष्ट्र राज्यात वेगाने वाढत असलेल्या पर्यटनाकरिता आवश्यक पायाभूत सुविधांच्या विकासात एमटीडीसी मोलाची भूमिका बजावत आहे आणि राज्यातील पर्यटनाचा प्रगतशील विकास, प्रोत्साहन आणि विस्तारासाठी ती प्रमुख प्रेरक शक्ती आहे.

महाराष्ट्रातील पर्यटक निवासांची साखळी उत्तम विकसित करण्याव्यतिरिक्त, एमटीडीसी पर्यटनाशी संबंधित विविध सुविधा जसे की मार्गदर्शित सहली, नौकाविहार, पर्यटक स्वागत केंद्रे, केंद्रीकृत किंवा ऑनलाईन आरक्षण प्रणाली, पारंपरिक सेवा आणि सर्वोत्तम टूर पॅकेजेस प्रदान करते.

महामंडळाचे अधिकृत भागभांडवल २५ कोटी रुपये असून, आजवरचे भरलेले भांडवल १५,३८,८८,१०० रुपये (अक्षरी रुपये पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार शंभर) इतके आहे. महामंडळाचे संपूर्ण भरणा झालेले भागभांडवल महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल यांच्या नावे आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील तत्त्वावर आधारित, महाराष्ट्र राज्यातील पर्यटक निवासांची सर्वात मोठी साखळी विकसित करून आणि सर्व प्रकारच्या पर्यटन सेवा प्रदान करून, एमटीडीसी आपली उद्दिष्टे यशस्वीपणे साध्य करत आहे.

आमची मुख्य उद्दिष्टे

  • महाराष्ट्र राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावणे.
  • पर्यटकांना आमचे 'अतिथी' मानून (अतिथी देवो भव) त्यांना रास्त दरात सर्वोत्तम सेवा आणि आनंद प्रदान करणे.
  • एमटीडीसीच्या पर्यटक निवासस्थानांमध्ये आणि उपाहारगृहांमध्ये उच्च दर्जाची निवास व्यवस्था आणि सेवा प्रदान करणे.
  • उत्पादकतेचे स्तर उंचावून आणि नफ्याचे प्रमाण वाढवून, एक कार्यक्षम आणि प्रगत कॉर्पोरेट संस्था म्हणून काम करणे
  • उत्तम प्रशिक्षण, प्रोत्साहन आणि मनुष्यबळ विकास तंत्रांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता उच्च स्तरावर नेणे.
  • उत्तरदायी पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण करणे.
  • आमच्या उत्पादनांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संवर्धन आणि विपणन करून महाराष्ट्राला एक प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे.
  • पर्यटन स्थळांच्या क्षमता मर्यादेचा विचार करून, राज्यामध्ये शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देणे.
  • महाराष्ट्राची कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वारसाचे संवर्धन व जतन करणे.
  • नवनवीन पर्यटन संकल्पनांना आणि कमी-ज्ञात स्थळांना प्रोत्साहन देणे.
  • वाहतूक, मनोरंजन, खरेदी, संमेलन आणि विश्रांती सेवा प्रदान करणे.
  • आतिथ्य क्षेत्रात सल्लागार आणि व्यवस्थापकीय सेवा प्रदान करणे.
  • पर्यटन स्थळांच्या विकासासाठी अग्रगण्य प्रयत्न करणे.
  • पर्यटन प्रकल्पांची संकल्पना व अंमलबजावणी, प्रसिद्धी, संवर्धन आणि प्रशिक्षणाबाबत राज्याच्या पर्यटन विभागाच्या/संचालनालयाच्या सहकार्याने सक्रिय भूमिका बजावणे.

संस्थात्मक संरचना

संचालक मंडळ

श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

श्री. शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई

मा. मंत्री (पर्यटन)

मा. अध्यक्ष, एमटीडीसी आणि नामनिर्देशित संचालक

श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक

श्री. इंद्रनील अनिता मनोहर नाईक

मा. राज्यमंत्री (पर्यटन)

उपाध्यक्ष, एमटीडीसी आणि नामनिर्देशित संचालक

श्री. ओम प्रकाश गुप्ता, आय.ए.एस.

श्री. ओम प्रकाश गुप्ता, आय.ए.एस.

अप्पर मुख्य सचिव, वित्त

नामनिर्देशित संचालक

डॉ. राजगोपाल देवरा

डॉ. राजगोपाल देवरा

अप्पर मुख्य सचिव, नियोजन

नामनिर्देशित संचालक

श्री. संजय खंदारे, आय.ए.एस.

श्री. संजय खंदारे, आय.ए.एस.

प्रधान सचिव

महाराष्ट्र शासन

डॉ. भगवंतराव पाटील, आय.ए.एस.

डॉ. भगवंतराव पाटील, आय.ए.एस.

संचालक, पर्यटन संचालनालय

महाराष्ट्र शासन

श्री. नीलेश उषाताई रमेश गटणे, आय.ए.एस.

श्री. नीलेश उषाताई रमेश गटणे, आय.ए.एस.

व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी

श्री. संजीव गौर

श्री. संजीव गौर

व्यवस्थापकीय संचालक, एफडीसीएम

नामनिर्देशित संचालक

एमटीडीसी अधिकारी

श्री. चंद्रशेखर जयस्वाल

श्री. चंद्रशेखर जयस्वाल

महाव्यवस्थापक

श्री. संजय पाटील

श्री. संजय पाटील

अधीक्षक अभियंता

श्री. जितेंद्र सोनवणे

श्री. जितेंद्र सोनवणे

उपमुख्य लेखापाल

लेखा व वित्त

श्री. संजय ढेकणे

श्री. संजय ढेकणे

वरिष्ठ व्यवस्थापक

विधी, सा. प्र. १ (आस्थापना), मालमत्ता

श्रीमती क्षिप्रा हाके - बोरा

श्रीमती क्षिप्रा हाके - बोरा

वरिष्ठ व्यवस्थापक

जलपर्यटन, निवास कार्य व आरक्षण

श्रीमती मानसी ताटके

श्रीमती मानसी ताटके

व्यवस्थापक

प्रसिद्धी, व्यवसाय विकास, डेक्कन ओडीसी, पर्यटन व अनुभव, पर्यटन संकल्पना

श्रीमती ज्योती कोळी

श्रीमती ज्योती कोळी

व्यवस्थापक

सा. प्र. २, माहिती तंत्रज्ञान (IT)

विभागीय संरचना

department structure

प्रादेशिक कार्यालये

regional office